अजहरचा ट्रेलर झाला रिलीज

 या देशात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटपटूंना देव मानणारे अनेक क्रिकेट चाहते आहेत. या चाहत्यांसाठी लवकरच मोहम्मद अझरुद्दीनच्या कारकिर्दीवर आधारित 'अजहर' हा बायोपिक येत आहे. 

Updated: Apr 1, 2016, 10:34 PM IST
अजहरचा ट्रेलर झाला रिलीज title=

मुंबई: या देशात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटपटूंना देव मानणारे अनेक क्रिकेट चाहते आहेत. या चाहत्यांसाठी लवकरच मोहम्मद अझरुद्दीनच्या कारकिर्दीवर आधारित 'अजहर' हा बायोपिक येत आहे. 

या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. यशाच्या शिखरावर गेलेल्या अजहरच्या आयुष्यात मॅच फिक्सिंगचं वादळ कसं येत, आणि या आरोपामुळे त्याची कारकिर्द कशी संपते, हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. 

या चित्रपटामध्ये इम्रान हाशमी अजहरच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसेल. तर इम्रान हाशमीबरोबर नर्गिस फकरी आणि प्राची देसाईही प्रमुख भूमिकेमध्ये असणार आहे. 13 मे रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

पाहा अजहरचा ट्रेलर