मुंबई : यंग आर्यन सध्या मुलींचं लक्ष वेधून घेतोय... त्याचा फॅन क्लबदेखील आता वाढू लागलाय... शेवटी तो बॉलिवूडचा 'किंग ऑफ रोमान्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आहे.
किंग खानचा मुलगा नुकताच लंडनच्या युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट झालाय. अत्तापर्यंत आर्यनचं नाव अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिच्यासोबत जोडलं जात होतं. नव्यासोबत आर्यनचे अनेक फोटोही चर्चेचा विषय ठरले होते... पण, ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मात्र आर्यन नव्यासोबत नाही तर दुसऱ्याच एका मुलीसोबत दिसलाय.
ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतरच्या एका पार्टीत आर्यन एका मुलीसोबत दिसतोय... कोण आहे ही मुलगी? हे मात्र अद्याप कोडचं आहे...
सांगायला मैत्रीण जरी असली तरी दोघांच्या फोटोजवरून नक्कीच चांगली केमिस्ट्री आहे असं दिसतंय. या अगोदर आर्यनने मला क्लबिंग करण्याऱ्या मुली आवडतच नाहीत असं एकदा म्हटलं होतं... आणि दुसरीकडे आता मात्र तो क्लबिंग करण्याऱ्या मुलीबरोबरच दिसू लागलाय. दोघांची जोडी मात्र दिसायला फारच गोड दिसतेय.