मुंबई: अभिनेता हृतिक रोशन आणि अर्जुन रामपाल आज एकदम भडकलेले दिसले आणि त्यांनी ट्विटरवरून आपला संतापही व्यक्त केलाय. एका इंग्रजी वृत्तपत्रात हृतिकची एक्स पत्नी सुझान खान आणि अभिनेता अर्जुन रामपालच्या अफेरची बातमी होती. त्यात लिहिलं होतं की, अर्जुन आणि सुझान खूप जवळचे मित्र आहेत. त्यांची मैत्री आता इतकी जवळ येतेय की त्यामुळं अर्जुन रामपालची पत्नी आणि सुझानच्या मैत्रीतही तणाव निर्माण होतोय.
या बातमीनुसार सुझान आणि अर्जुनच्या जवळीकीमुळं अर्जुनची पत्नी मेहर चांगलीच नाराज आहे. कारण काही महिन्यांपूर्वी अर्जुन आणि सुझाननं परदेशात एकत्र वेळ घालवला होता. त्यामुळं मेहर नाजार आहे. बातमीनुसार अर्जुननं दोघं पती-पत्नी आणि दोन मैत्रिणींना वेगळं केलंय.
मात्र वृत्तपत्राच्या या बातमीवर अर्जुन रामपाल आणि हृतिक रोशन चांगलेच संतापलेत. दोन्ही अभिनेत्यांनी ट्वीट करून आपला संताप व्यक्त केलाय.
But powerful good people know how 2walk their truth no matter what...
— Hrithik Roshan (@iHrithik) November 24, 2014
Bombay Times, who paid you? Who are these faceless accusers? If you have the guts reveal them first. Stay away from me and my family.
— arjun rampal (@rampalarjun) November 24, 2014
हृतिकनं ट्वीट करून लिहीलं, ‘जर लोकांना माहिती झालं की तुम्ही किती खोटी बातमी छापत, तर हा पेपर विकणं बंद होईल, मी आज खूप नाराज आहे.’
If u people knew hw much false news is printed, d papers wud actually stop selling. I am disgusted 2day..
— Hrithik Roshan (@iHrithik) November 24, 2014
तर अर्जुन रामपालनं ट्वीट करून लिहिलंय, तुम्हाला या बातमीसाठी कोणी पैसे दिले, असे खोटे लोक कोण आहे, जर हिंमत असेल तर पहिले अशा लोकांनी समोर यावं, माझ्या आणि माझ्या कुटुंबापासून दूर राहा’.
तर दुसरीकडे सुझान खानही यामुळं चांगली टेंशनमध्ये असल्याचं कळतंय. नुकतंच सुझाननं ही बातमी अफवा असल्याचं म्हटलं होतं. मेहर आणि अर्जुनही आजही माझे जवळचे मित्र आहे, असं ती म्हणाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.