सोनाक्षीची काळजी घेतात माझे बाबा: अर्जुन कपूर

‘तेवर’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत काम करणारा अभिनेता अर्जुन कपूरनं सांगितलं की, त्याचे वडील फिल्म निर्माता बोनी कपूर सोनाक्षीची खूप काळजी घेतात आणि आपल्या मुलीसारखं तिच्यासोबत वागतात. 

Updated: Jan 1, 2015, 11:48 AM IST
सोनाक्षीची काळजी घेतात माझे बाबा: अर्जुन कपूर title=

मुंबई: ‘तेवर’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत काम करणारा अभिनेता अर्जुन कपूरनं सांगितलं की, त्याचे वडील फिल्म निर्माता बोनी कपूर सोनाक्षीची खूप काळजी घेतात आणि आपल्या मुलीसारखं तिच्यासोबत वागतात. 

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेला अर्जुन म्हणतो, “माझे वडील माझ्यापेक्षा दुसऱ्या कुणावर तरी जास्त प्रेम करतात. मला हे अगोदरपासूनच माहिती होतं, जसं सोनाक्षीचं व्यक्तीमत्त्व आहे, ती माझ्या बाबांची खूप लाडकी बनेल.” 

अर्जुन म्हणतो, सोनाक्षीचं व्यक्तीमत्त्व दिलखुलास आहे. आपल्या मुलीप्रमाणे माझे वडील तिची काळजी घेतात. ‘तेवर’ फिल्मचे निर्माते बोनी कपूर आणि संजय कपूर आहेत. यात मनोज वाजपेयी पण प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट जानेवारीमध्ये रिलीज होईल. 

सोनाक्षी आणि अर्जुन लहानपणापासूनचे मित्र आहेत. अर्जुन सांगतो, दोन-तीन वेळा माझ्या वडिलांनी मला सल्ला दिली की, मी सोनाक्षीसोबत कसं वागायचं ते. पण मी काम कसं करायचं याबद्दल ते कधीच कोणता सल्ला देत नाहीत. एवढंच नव्हे तर सेटवर ते मला सोनाक्षीसोबत गंमत करण्याचीही परवानगी देत नाहीत. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.