नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांतवर आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आलीय. ‘मै हूँ रजनीकांत’ या सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत रजनीकांतनं कोर्टाचे दरवाजे ठोठावलेत.
यानिमित्तानं पहिल्यांदाच सार्वजनिक जीवनात आपल्या शिवाजी राव गायकवाड या खऱ्या नावाचा वापर रजनीनं केलाय.
मद्रास हायकोर्टात हा खटला दाखल झालाय. ‘वैयक्तिक अधिकार’ जपण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचं रजनीनं म्हटलंय.
‘मै हूँ रजनीकांत’ या सिनेमाच्या निर्मात्यानं आपल्या कोणत्याही लेखी किंवा तोंडी परवानगिशिवाय आपल्या नावाचा वापर सिनेमात केल्याचा आरोप रजनीनं आपल्या तक्रारीत केलाय. यामुळे, आपल्या लाखो-करोडो फॅन्सची दिशाभूल होण्याची शक्यता, रजनीनं व्यक्त केलीय.
आपल्या फॅन्सची दिशाभूल होऊ नये, यासाठी आपण कोणत्याही प्रोडक्ट, सिनेमा किंवा लेखनाची जाहिरात करत नाही... असंही यामध्ये रजनीनं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.