भारत-पाक मॅच आणि अमिताभ बच्चन यांची लाईव्ह कॉमेंट्री!

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन भारत-पाकिस्तान मॅचची लाईव्ह कॉमेंट्री करतायेत. 

Updated: Feb 15, 2015, 03:33 PM IST
भारत-पाक मॅच आणि अमिताभ बच्चन यांची लाईव्ह कॉमेंट्री! title=

मुंबई : बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन भारत-पाकिस्तान मॅचची लाईव्ह कॉमेंट्री करतायेत. 

हिंदी सिनेमांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांची रेडिओ जॉकी बनण्याची इच्छा होती. 
त्यांची ही इच्छा आता पूर्ण होतेय. 

वर्ल्डकपमध्ये सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची कॉमेंट्री बिग बी करत आहेत. पण त्यांना क्रिकेट आवडतं म्हणून ते कॉमेंट्री करत नाहीयेत तर त्यांचा सिनेमा 'शमिताभ'च्या प्रमोशनसाठी अमिताभ कॉमेंट्री करतायेत.
 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना मॅच सकाळी नऊपासून सुरू झालीय. अमिताभ बच्चन हे कपिल देव आणि शोएब अख्तर या माजी खेळांडूसोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत.
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.