अखेर, शाहरुखच्या अनधिकृत रॅम्पवर हातोडा!

अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेरील अनधिकृत रॅम्पवर कारवाई करण्यास शनिवारी सकाळीच महापालिकेनं सुरुवात केलीय. 

Updated: Feb 14, 2015, 10:46 PM IST
अखेर, शाहरुखच्या अनधिकृत रॅम्पवर हातोडा! title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेरील अनधिकृत रॅम्पवर कारवाई करण्यास शनिवारी सकाळीच महापालिकेनं सुरुवात केलीय. 


महापालिकेची कारवाई

शाहरुख खानचं आपल्या ‘व्हॅनिटी व्हॅन’साठी हा रॅम्प बांधून घेतला होता. अनधिकृत रॅम्प हटवण्याबाबत महापालिकेनं शाहरुख खानला सात दिवसांची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली होती. 

या रॅम्पमुळे स्थानिकांना त्रास होत असल्यामुळे तो हटवण्याची मागणी खासदार पूनम महाजन यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.