रेखासोबत काम करण्याचा पर्याय खुला- अमिताभ बच्चन

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी म्हणजे पडद्यावरची सर्वात लोकप्रिय जोडी राहिलीय. बिग बींचं म्हणणं आहे की, भविष्यात रेखासोबत काम करण्यासंदर्भात त्यांनी नकारही दिला नाहीय.

Updated: Jan 8, 2015, 10:41 AM IST
रेखासोबत काम करण्याचा पर्याय खुला- अमिताभ बच्चन title=

मुंबई: बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी म्हणजे पडद्यावरची सर्वात लोकप्रिय जोडी राहिलीय. बिग बींचं म्हणणं आहे की, भविष्यात रेखासोबत काम करण्यासंदर्भात त्यांनी नकारही दिला नाहीय.

अमिताभ-रेखा जोडीनं सिलसिला, मिस्टर नटवरलाल, मुकद्दर का सिकंदर सारखे हिट चित्रपट दिले आहेत. आगामी काळात बाल्की यांच्या 'शमिताभ'मध्ये मुख्य भूमिकेत असलेले अमिताभ बच्चन म्हणतात, दिग्दर्शक त्यांच्या आणि रेखासोबत चित्रपट बनवू इच्छितात.

फिल्मच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान बिग बींनी सांगितलं, 'बाल्की मला म्हणत राहिले की ते एक फिल्म सोबत बनवू इच्छितात. बघू जर चांगली कथा असेल तर का नाही करायची.'

'शमिताभ'मध्ये रेखा- अमिताभ जोडी पडद्यावर दिसेल अशी चर्चा सुरू होती. मात्र अमिताभ बच्चन यांनी रेखा आणि त्यांचं एकत्र कोणतंही दृश्य चित्रपटात नाही हे स्पष्ट केलंय. 

त्यांनी सांगितलं, 'आम्ही सोबत नाही आलो नाहीय, जेव्हा प्रेक्षक चित्रपट पाहतील तेव्हा ते लक्षात येईलच.' चित्रपटाच्या नावाबद्दल विचारलं असता बिग बी म्हणाले, मला वाईट वाटतं जेव्हा कोणी या नावाला अजिब म्हणतं तेव्हा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.