बांगलादेशात या हिरोसाठी लट्टू झाल्यात तरुणी

बॉलीवूडमधील हिरो म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो तो तगडा, उंचपुरा, गोरा आणि रेखीव चेहरा असलेला अभिनेता. मात्र बांगलादेशातील या तरुणाने हिरोची व्याख्याच बदललीये.

Updated: Dec 16, 2016, 02:16 PM IST
बांगलादेशात या हिरोसाठी लट्टू झाल्यात तरुणी title=

मुंबई : बॉलीवूडमधील हिरो म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो तो तगडा, उंचपुरा, गोरा आणि रेखीव चेहरा असलेला अभिनेता. मात्र बांगलादेशातील या तरुणाने हिरोची व्याख्याच बदललीये.

बांगलादेशचा आलोम बोगरा हा हिरो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. इतकंच नव्हे तर यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणी तासन् तास उभ्या राहतात. 

बांगलादेशच्या या हिरोला पाहिल्यावर भले त्याला कोणी हिरो म्हणणार नाही मात्र तेथील तरुणी यांच्यासोबत काम करण्यासाठी वेड्या झाल्यात. हिरो आलोमने आतापर्यंत 500हून अधिक गाणी प्रोड्यूस केलीत. तर अनेक सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका केल्यात. अनेक व्हिडीओही यूट्यूबवर फेमस आहेत.