'संस्कारी बाबूजी' आता 'ट्वीटर'वर करणार 'कन्यादान'

कधीतरी ट्वीटरवर गंमतीचा विषय झालेले अलोकनाथ आता ट्वीटरवर दाखल झाले आहेत. ट्वीटरवर आल्यावर अलोकनाथ यांनी लिहलंय, 'प्रणाम ट्वीटर वर्ल्ड'.

Updated: Jun 26, 2014, 09:17 PM IST
'संस्कारी बाबूजी' आता 'ट्वीटर'वर करणार 'कन्यादान' title=

मुंबई : कधीतरी ट्वीटरवर गंमतीचा विषय झालेले अलोकनाथ आता ट्वीटरवर दाखल झाले आहेत. ट्वीटरवर आल्यावर अलोकनाथ यांनी लिहलंय, 'प्रणाम ट्वीटर वर्ल्ड'.

अलोकनाथ यांचे काही क्षणातचं तीन हजार फॉलोअर्स झाले आहेत.

सिनेमा आणि टीव्ही सिरियल्स यामुळे आपल्या संस्कारी बाबुजीच्या भूमिकेमुळे अलोकनाथ ट्वीटरकरांसाठी संस्कारी बाबूंजी नावाने प्रसिद्ध झाले आहेत.

आताही अलोकनाथ ट्वीटरवर आले आणि लोकांनी गंमती जमती करायला सुरूवात झाली आहे.

1) अखेर अलोक नाथ यांनी ट्वीटरला आपला आशीर्वाद दिलाच 

2) अलोक नाथ आले आणि ट्वीटरवर अगरबत्तींचा सुंगधित धूर पसरला

3) अलोक नाथ यांनी आपल्या ट्वीटरवर 'साईन इन केलं' की 'गृह प्रवेश'

4) अलोक नाथ जेव्हा जन्माला आले होते, तेव्हा नर्सने म्हटलं होतं, अभिनंदन बाबूजी जन्माला आले आहेत.

5) अलोक नाथ एवढे संस्कारी आहेत की, त्यांच्या घरात कुकरही शिटी मारत नाही.

6) आता ट्वीटरवर होणार कन्यादान

7) अलोक नाथ यांना कधीच पगार मिळाला नाही, त्यांना नेहमीच पेन्शन मिळाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.