'चोरी चोरी, छुपके छुपके' प्रीतीनं उडवला लग्नाचा बार!

'नाही... नाही' म्हणत बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर परदेशी बाबू आणि तिचा बॉयफ्रेंड गुडएनफ याच्यासोबत विवाह बंधनात अडकलीय.  

Updated: Mar 1, 2016, 03:52 PM IST
'चोरी चोरी, छुपके छुपके' प्रीतीनं उडवला लग्नाचा बार! title=

नवी दिल्ली : 'नाही... नाही' म्हणत बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर परदेशी बाबू आणि तिचा बॉयफ्रेंड गुडएनफ याच्यासोबत विवाह बंधनात अडकलीय.  

या अगोदर प्रीतीच्या लग्नाच्या मीडियात चर्चा सुरू झाल्यानंतर आपण आत्ताच लग्न करणार नसल्याचं प्रीतीनं म्हटलं होतं. पण, आता मात्र ती विवाहबद्ध झाल्याचं 'फिल्मफेअर'नं म्हटलंय. 

गुडएनफ अमेरिकेतील बिझनेसमन आहे आणि तो प्रीतीहून १० वर्षांनी लहान आहे. प्रीती आणि गुडएनफ यांचा विवाह एका खाजगी सोहळ्यात पार पडला. 

सुझान खानचीही उपस्थिती

बॉलिवूड वर्तुळातून ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान आणि सुरीली गोयल या विवाहसोहळ्यात दाखल झाल्याचं समजतंय. लॉस एन्जेलिसमधले आपले काही फोटोही सुझाननं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलेत.  

Calif Sunday with my @surilydpgoel Sunshine and a vintage car. #cityofangels #LA #dreamcatcher

A photo posted by Sussanne Khan (@suzkr) on