श्री-जान्हवीचं मालिकेत जुळलं, पण प्रत्यक्षात बिघडलं

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेमुळे प्रत्येकाच्या घरात पोहोचलेले आणि सर्वांचे लाडके असलेले श्री आणि जान्हवी अर्थात अभिनेता शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी प्रत्यक्षात घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. आपल्याला हा मालिकेतील ट्विस्ट किंवा पब्लिसिटी स्टंट वाटेल, पण हे खरंय....

Updated: Apr 29, 2015, 09:23 AM IST
श्री-जान्हवीचं मालिकेत जुळलं, पण प्रत्यक्षात बिघडलं title=

पुणे: 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेमुळे प्रत्येकाच्या घरात पोहोचलेले आणि सर्वांचे लाडके असलेले श्री आणि जान्हवी अर्थात अभिनेता शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी प्रत्यक्षात घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. आपल्याला हा मालिकेतील ट्विस्ट किंवा पब्लिसिटी स्टंट वाटेल, पण हे खरंय....

शशांकनं पुण्यातील फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याची माहिती मिळतेय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये व्यावसायिक तसंच व्यक्तिगत आयुष्यात खटके उडत आहेत. आता हा वाद विकोपाला गेलाय. 

मालिकेत खरं तर आता पुन्हा चांगलं होतंय. दोघांची दिलजमाई होऊन लवकरच जान्हवी गोखलेंच्या घरात येईल, असं चित्र दिसतंय. पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात मात्र हा वाद घटस्फोटाच्या उंबरठ्यावर गेलाय.

८ फेब्रुवारी २०१४ला पुण्यात शशांक आणि तेजश्रीचा विवाह झाला होता. मालिकेतील हीट जोडी म्हणून प्रेक्षकांनाही त्यांच्या विवाहाची उत्सुकता होती. पण एका वर्षातच त्यांच्या कटुता निर्माण झालीय. विवाह पुण्यात झाल्यानं पुण्यातील फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यात आल्याचं कळतंय. यात शशांकनं आपल्या आयुष्यातील घडलेल्या प्रसंगाचे दाखले दिले आहेत. 

सध्या हे दोघंही मालिकेसोबतच रंगभूमीवर उतरले आहेत. शशांक 'गोष्ट तशी गमतीची' आणि तेजश्री 'कार्टी काळजात घुसली' हे नाटक करतायेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.