अनुष्का-विराट दिसणार मोठ्या पडद्यावर

विराट अनुष्का यांच्यापेक्षा त्यांच्या फॅन्सना चैन पडत नसल्याचं दिसतंय, या जोडीची लोकप्रियता लक्षात घेऊन, ही जोडी लवकरच मोठ्या पडद्यावरही दिसणार आहे, विराट-अनुष्का एखाद्या बॉलिवूड सिनेमामध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जातंय

Updated: Apr 28, 2015, 06:22 PM IST
अनुष्का-विराट दिसणार मोठ्या पडद्यावर title=

मुंबई : विराट अनुष्का यांच्यापेक्षा त्यांच्या फॅन्सना चैन पडत नसल्याचं दिसतंय, या जोडीची लोकप्रियता लक्षात घेऊन, ही जोडी लवकरच मोठ्या पडद्यावरही दिसणार आहे, विराट-अनुष्का एखाद्या बॉलिवूड सिनेमामध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जातंय

दिग्दर्शक अनुराग कश्यपने दिग्दर्शित 'बॉम्बे वेलवेट' मध्ये रणबीर कपूरची मुख्य भूमिका आहे. चर्चा अशी आहे की, विराट सत्तरच्या दशकातील क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला अनष्का किंवा विराटकडून दुजोरा मिळाला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, विराट आणि अनुष्का 'बॉम्बे वेलवेट'मध्ये दिसण्याची शक्यता आहे. 

अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा रोमँटिक असल्याचे बोलले जात आहे. अनुष्का शर्मासह रणबीर कपूर, करण जोहर आणि के. के. मेनन मुख्य भूमिकेत असणार आहे. बॉम्बे वेलवेट हा सिनेमा ज्ञान प्रकाश यांच्या 'मुंबई फॅबल्स' या पुस्तकावर अधारित आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.