अभिनेता सलमान खानची 'हवा'च्या सेटवर फूलटू धमाल

'चला हवा येऊ द्या'ची भूरळ आता बॉलिवूडला चांगलीच पडू लागली आहे. अभिनेता जॉन, विद्या आणि शाहरूखनंतर आता दबंग सलमान खाननेही हवा येऊ द्याच्या सेटवर हजेरी लावली.

Updated: Jun 30, 2016, 09:42 AM IST
अभिनेता सलमान खानची  'हवा'च्या सेटवर फूलटू धमाल title=

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'ची भूरळ आता बॉलिवूडला चांगलीच पडू लागली आहे. अभिनेता जॉन, विद्या आणि शाहरूखनंतर आता दबंग सलमान खाननेही हवा येऊ द्याच्या सेटवर हजेरी लावली.

सलमानच्या या एपिसोडचे शूटिंग नुकतच गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये पार पडले. यावेळी सलमानने 'हवा'च्या 'अवलियां'बरोबर फूलटू धमाल केली. त्यामुळे आता 'हवा येऊ द्या'च्या या एपिसोडची उत्सुकता नक्कीच वाढली. या एपिसोडचं प्रक्षेपण ४ आणि ५ जुलै रोजी होणार आहे.