VIDEO : आराध्या जखमी झाली, ऐश्वर्या भडकली!

ऐश्वर्या राय बच्चन सध्या आपल्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच, ऐश्वर्या आपल्या चिमुकलीला घेऊन शुटिंगसाठी दाखल झाली होती. 

Updated: Feb 11, 2016, 04:51 PM IST
VIDEO : आराध्या जखमी झाली, ऐश्वर्या भडकली! title=

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन सध्या आपल्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच, ऐश्वर्या आपल्या चिमुकलीला घेऊन शुटिंगसाठी दाखल झाली होती. 

पण, व्हायचं तेच झालं... व्हॅनिटी व्हॅनमधून आराध्याला घेऊन ऐश्वर्या खाली उतरली आणि प्रसारमाध्यमांनी तिला गराडा घातला. 

'बेस्ट मॉम' बनण्याचा प्रयत्न करणारी अॅश आपल्या मुलीला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती... पण, व्हॅनिटी व्हॅनपासून आपल्या कारपर्यंत पोहचणंही तिला कठिण झालं होतं. 

याच गडबडीत आपल्या गाडीत बसताना आराध्याला धक्का लागला आणि ती जखमी झाली... त्यामुळे, ती जोरजोरात रडू लागली. हे पाहून ऐश्वर्या आणखीनच भडकली... आणि एक चकार शब्दही न काढता ती आपल्या गाडीमधून निघून गेली.