आमिर खानची आणखी एक सकारात्मक प्रतिक्रिया

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नकारात्मक वक्तव्य करून वादात सापडला होता. मात्र आता आमिरने सावध भूमिका घेत, सकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. मात्र आमिरवर लपून वार करणाऱ्यांवर, ही सकारात्मक प्रतिक्रिया बुमरँग होत आहे.

Updated: Jan 8, 2016, 09:59 PM IST
आमिर खानची आणखी एक सकारात्मक प्रतिक्रिया title=

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नकारात्मक वक्तव्य करून वादात सापडला होता. मात्र आता आमिरने सावध भूमिका घेत, सकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. मात्र आमिरवर लपून वार करणाऱ्यांवर, ही सकारात्मक प्रतिक्रिया बुमरँग होत आहे.

आमीर खानच्या सुरक्षेत कपात करण्यात आली, त्याचं आमिर खानने समर्थन केलं आहे, आपल्याला मुंबई पोलिस आणि त्यांच्या सुरक्षेवर पूर्ण विश्वास असल्याचं आमिर खानने म्हटलं आहे. 

ट्वीटर पर प्रतिक्रिया देतांना आमिर खान म्हणाला,  मी मुंबई पोलिसांच्या निर्णयाचं स्वागत करतो, या सुरक्षेचा वापर मुंबई शहराला आणखी सुरक्षित करण्यासाठी होऊ शकतो, आणि मला विश्वास आहे जेव्हा मला सुरक्षेची गरज लागेल मुंबई पोलिस सुरक्षेसाठी पुढे येईल.