'पीके'च्या दुसऱ्या पोस्टरमध्ये ट्रान्झिस्टरही नसणार- आमीर

आमीर खानच्या 'पीके' या आगामी सिनेमाच्या पोस्टरची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. आमीरचा हा अवतार सगळ्यांनाच चकीत करणारा ठरलाय. कारण या पोस्टरमध्ये आमीरच्या अंगावर कोणतचं वस्त्र नाही आणि त्यामुळंच अमीरचं हे पोस्टर चर्चेत आलंय.

Updated: Aug 13, 2014, 08:23 PM IST
'पीके'च्या दुसऱ्या पोस्टरमध्ये ट्रान्झिस्टरही नसणार- आमीर title=

मुंबई: आमीर खानच्या 'पीके' या आगामी सिनेमाच्या पोस्टरची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. आमीरचा हा अवतार सगळ्यांनाच चकीत करणारा ठरलाय. कारण या पोस्टरमध्ये आमीरच्या अंगावर कोणतचं वस्त्र नाही आणि त्यामुळंच अमीरचं हे पोस्टर चर्चेत आलंय.

या पोस्टरमध्ये आमीरने आब राखण्यासाठी केवळ एका ट्रान्जिस्टरचा आधार घेतलाय होता... मात्र येत्या 20 तारखेला रिलीज होणाऱ्या पीकेच्या दुसऱ्या पोस्टरवर तुम्हाला आमीरसोबत तो ट्रान्जिस्टरही दिसणार नाहीय. त्यामुळं 'पीके'चं हे पुढचं पोस्टर कसं असणार? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

मुंबई विद्यापीठात आज आमिर खाननं मराठीचेही धडे दिले. जर्मन विभागाकडून अमराठी भाषिकांसाठी माय मराठी नावाच्या एका पुस्तकाचं प्रकाशन आज करण्यात आलं. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, आमीर खानच्या 'पीके'चं हे शूट राजस्थानच्या एका कमी वापरात असलेल्या रेल्वे ट्रॅकवर केलं गेलंय. यावेळी सुरक्षा व्यवस्थेत आमीरनं हे शूट केलं. तसंच शूटिंगला काही ठराविकच व्यक्ती उपस्थित होते. 

पाहा आमीर काय म्हणाला

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.