आमीर, पीके पोस्टर आणि शाहरूख

'पीके' या चित्रपटाच्या पोस्टरवर आमीर खानने शर्ट घातलेला दिसत नाही, यावर शाहरूख खान आमीरला टोमणा मारायला विसरलेला नाही. आमीरचं हे पोस्टर 'असभ्य' असल्याचं शाहरूखने म्हटलं आहे.

Updated: Aug 4, 2014, 01:56 PM IST
आमीर, पीके पोस्टर आणि शाहरूख title=

मुंबई : 'पीके' या चित्रपटाच्या पोस्टरवर आमीर खानने शर्ट घातलेला दिसत नाही, यावर शाहरूख खान आमीरला टोमणा मारायला विसरलेला नाही. आमीरचं हे पोस्टर 'असभ्य' असल्याचं शाहरूखने म्हटलं आहे.

एका खासगी टीव्ही चॅनलवर बोलतांना शाहरूखने ही टिपण्णी केली आहे. टीव्ही अँकरने शाहरूखला विचारलं, "तुमच्या बेल्टमध्ये असं कोणतं टॅलेंट आहे, जे तुम्ही जगाला दाखवू इच्छिता?".

यावर शाहरूखने आपल्या अनोख्या ढंगात उत्तर दिलं, "काय अश्लील बोलताय तुम्ही, असं वाटतंय, तुम्ही पीकेच्या पोस्टरविषयी बोलताय".

यानंतर त्या टीव्ही अँकरने विचारलं, आमीरने पीकेच्या पोस्टरमध्ये जी कला दाखवली आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

यावर शाहरूख खान म्हणतो, "यार कमीत कमी या गोष्टीला कला तरी म्हणू नका".

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.