गूगलचं आज सदाबहार डुडलं

 किशोरदांचा आज जन्मदिवस, या निमित्ताने गूगलने डुडल तयार केलंय. किशोरदांची आज 85 वी जयंती आहे. किशोरदांची गाणी सदाबहार आहेत. गूगलच्या होमपेजवर भारतीय सिनेसृष्टीतील या लिजंडला डूडलद्वारे आदरांजली वाहण्यात आली आहे. 

Updated: Aug 4, 2014, 10:33 AM IST
गूगलचं आज सदाबहार डुडलं title=

मुंबई :  किशोरदांचा आज जन्मदिवस, या निमित्ताने गूगलने डुडल तयार केलंय. किशोरदांची आज 85 वी जयंती आहे. किशोरदांची गाणी सदाबहार आहेत. गूगलच्या होमपेजवर भारतीय सिनेसृष्टीतील या लिजंडला डूडलद्वारे आदरांजली वाहण्यात आली आहे. 

किशोरदांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 मध्ये झालं आहे. किशोरदांचं मूळ नाव, आभास कुमार गांगुली होतं. किशोरदांनी शिकारी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. किशोरदांचे बॉक्स ऑफिसवर काहीच चित्रपट गाजले असले, तरी साठच्या दशकात किशोरदांनी यशाचं शिखर गाठलं ते, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चनचे आवाज बनले होते.
 
किशोर कुमार यांनी चार लग्न केली. रुमा गुहा ठाकुरता या त्यांच्या पहिल्या पत्नी. किशोरदांचं पहिलं लग्न आठ वर्ष टिकलं. किशोरदांनी यानंतर सौंदर्यवती मधुबाला यांच्याशी त्यांनी विवाह केला. 

विशेष म्हणजे मधुबाला आजारी असतानाही किशोर दांनी त्यांच्याशी विवाह केला. त्यानंतर योगिता बालींशी झालेलं लग्न अवघी दोन वर्षच टिकलं. तर लीना चंदावरकर या त्यांच्या चौथ्या पत्नी.
 
किशोर कुमार यांचा मृत्यू 13 ऑक्टोबर 1987 रोजी झाला आणि त्यांचा सदाबहार आवाज आजही अजरामर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.