आमीर खान अखेर सलमान खानच्या भेटीला

बॉलीवूडमध्ये ज्याची मिस्टर परफेक्ट अशी ओळख आहे, असा आमीर खान सलमान खानच्या भेटीला आज आला होता. 

Updated: May 7, 2015, 07:43 PM IST
आमीर खान अखेर सलमान खानच्या भेटीला title=

मुंबई : बॉलीवूडमध्ये ज्याची मिस्टर परफेक्ट अशी ओळख आहे, असा आमीर खान सलमान खानच्या भेटीला आज आला होता. 

आमीर खानच्या भेटीवर नेटीझन्स काय प्रतिक्रिया देतात हे औत्सुक्याचं ठरणार आहे. 

न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवल्यानंतर, आमीर खानने सलमान खानची भेट घेतली, हे आमीर खानच्या किती फॅन्सना पचेल हे आता महत्वाचं ठरणार आहे.

आमीर खान सलमान खानच्या भेटीला येईल याची कुणालाही अपेक्षा नव्हती, आमीरचं येणं कुणालाही अपेक्षित नव्हतं.

कारण संजय दत्तला शिक्षा झाली तेव्हा आमीर आणि संजय हे पीके चित्रपटासाठी एकत्र काम करत होते, तेव्हा देखिल आमीर खानने संजय दत्तविषयी बोलणं टाळलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.