मुंबई : 'हिट अँड रन' प्रकरणात सलमान खानला पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली, यानंतर सलमानची पाठराखण करण्यासाठी बॉलीवूडमधील काही मंडळी पुढे येत असतांना, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी त्याच्या समर्थकांना चांगलंच फटकारलंय.
गायक अभिजित भट्टाचार्य याच्या वक्तव्यावर बोलतांना ऋषी कपूर म्हणाले, "मला एखाद्या दिवशी हुकूमशहा होता आले असते, तर गायक अभिजीतला नपूंसक बनवले असते, असं वादग्रस्त मत ऋषी कपूर यांनी मांडलंय.
सलमानला पाठिंबा देण्याच्या नादात गायक अभिजीत यांचा तोल गेला आणि त्यांनी कुत्रे रस्त्यावर झोपले तर ते मरणारंच असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरुन टीका होताच अभिजीत यांनी माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सलमानला पाठिंबा देणा-यांवर चांगलेच नाराज झाल्याचे दिसते. गुरुवारी रात्री ऋषी कपूर यांनी ट्विटरद्वारे सलमानच्या समर्थकांना खडेबोल सुनावले आहेत.
यावर बोलतांना ऋषी कपूर म्हणाले, मीदेखील सलमानचा शुभचिंतक आहे, पण या प्रकरणात तुम्ही तर्कसंगत मत मांडायला हवे, असे ऋषी कपूर यांनी म्हटले आहे. सलमानचा चमचा होण्यासाठी काही जण हा खटाटोप करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.