आमिर खानच्या 'पीके'चा ६०० कोटींचा लयभारी गल्ला

प्रखर विरोधांनंतरही अभिनेता आमिर खान याच्या ‘पीके’ या सिनेमाने कमाईचा उच्चांक गाठला आहे. जगभरात ‘पीके’ने तब्बल ६०० कोटी रुपयांचा टप्पा पार केलाय. त्यामुळे या सिनेमाने रेकॉर्ड केलाय.

Updated: Jan 10, 2015, 07:23 PM IST
आमिर खानच्या 'पीके'चा ६०० कोटींचा लयभारी गल्ला title=

मुंबई : प्रखर विरोधांनंतरही अभिनेता आमिर खान याच्या ‘पीके’ या सिनेमाने कमाईचा उच्चांक गाठला आहे. जगभरात ‘पीके’ने तब्बल ६०० कोटी रुपयांचा टप्पा पार केलाय. त्यामुळे या सिनेमाने रेकॉर्ड केलाय.

रेकॉर्ड कामगिरी करणारा ‘पीके’हा बॉलिवूडमधील पहिला सिनेमा ठरला आहे. त्यामुळे ‘पीके’ने कमाईचा इतिहास रचला आहे. राजकुमार हिरानी यांचा पीके हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. हा सिनेमा ४,८०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला.

आमिर आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा किस नवीन रेकॉर्ड करणार, अशी चर्चा होती. यामध्ये किस, लिप लॉप किसचा मसाला पाहायला मिळेल, असे सांगितले गेले. पीकेमध्ये किसचा जलवा पाहायला मिळेल, असे वृत्त प्रसिद्ध झाल्याने या सिनेमाची चर्चा होती. २७ पेक्षा जास्त किस या सिनेमात असल्याचे सांगितले गेले. तसेच बाबालोक, जातपात यावर या सिनेमावर भाष्य करण्यात आले आहे.

याआधी आमिरच्या ‘गजनी’ने १०० कोटी रुपये कमवले होते. त्यानंतर ‘थ्री इडियट्स’ने २०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आमिरने सलमान खान, शाहरुख खानला आता मागे टाकले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.