रणबीर - कतरिनाचा गुपचूप साखरपुडा?

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी लंडनमध्ये गुपचूप साखरपुडा केल्याचे वृत्त आहे. मात्र, याला अधिक दुजोरा मिळाला आहे.

Updated: Jan 9, 2015, 11:26 PM IST
रणबीर - कतरिनाचा गुपचूप साखरपुडा? title=

मुंबई : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी लंडनमध्ये गुपचूप साखरपुडा केल्याचे वृत्त आहे. मात्र, याला अधिक दुजोरा मिळाला आहे.

दोघांनी एक घर खरेदी करुन एकत्रित राहण्याचाही निर्णय घेतला. पण, आता या जोडीने आणखी पुढचे पाऊल टाकत साखरपुडा उरकून यंदाच्या वर्षात शुभमंगल करण्याचा दोघांचाही विचार असल्याचे समजते.

रणबीर - कतरिनाने ३० डिसेंबर २०१४ रोजी लंडनमध्ये गुपचूप साखरपुडा उलकला. कतरिना गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत आहे. 

तर रणबीर आपला मित्र अयान मुखर्जीसोबत लंडनच्या विमानतळावर आढळून आला. त्यानंतर रणबीरने कतरिनासोबत साखरपुडा करूनच लंडनहून परतण्याचे ठरविले. रणबीरच्या कुटुंबियांसाठी खासगी विमानाची लंडनला येण्याची व्यवस्था कतरिनाच्या कुटुंबियांनी केली. ऋषि आणि नितू कपूर लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकण्यात आल्याची चर्चा आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.