आकाश ठोसरच्या नव्या चित्रपटाचे टिझर रिलीज

आकाश ठोसरचा आगामी चित्रपट ‘एफयू’ ची सर्वांनाच ओढ लागली आहे. कॉलेजच्या दिवसात आपण बेभान जगत असतो. आपण आपल्या मनाचे राजे असतो. याच दिवसात आपण पुढच्या आयुष्याची स्वप्न पाहण्यातही गुंग असतो. असाच काहीसा आपल्या जुन्या आठवणींना उजाला देणारा या चित्रपटाचा टिझर आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तरुणाईला वेड लावेल, अशीच या चित्रपटाची निर्मिती केल्याचे दिसून येते.

Intern Intern | Updated: Apr 24, 2017, 02:14 PM IST
आकाश ठोसरच्या नव्या चित्रपटाचे टिझर रिलीज title=

मुंबई : आकाश ठोसरचा आगामी चित्रपट ‘एफयू’ ची सर्वांनाच ओढ लागली आहे. कॉलेजच्या दिवसात आपण बेभान जगत असतो. आपण आपल्या मनाचे राजे असतो. याच दिवसात आपण पुढच्या आयुष्याची स्वप्न पाहण्यातही गुंग असतो. असाच काहीसा आपल्या जुन्या आठवणींना उजाला देणारा या चित्रपटाचा टिझर आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तरुणाईला वेड लावेल, अशीच या चित्रपटाची निर्मिती केल्याचे दिसून येते.

या चित्रपटात आकाश आपल्याला नव्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटात त्याचा वेस्टर्न लूक पाहायला मिळेल. रॉक बॅण्डमध्ये गाणाऱ्या आकाशसोबत संस्कृती बालगुडेही या चित्रपटात दिसणार आहे. सैराटमध्ये मार खाणारा आकाश आता हॉकीस्टिक घेऊन मारामारी करताना दिसतोय.
या चित्रपटात एक्स्ट्रॉ क्लासेसच्या नावाखाली मजामस्ती करणारी तरुणाईही पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात सचिन खेडेकर, शरद पोंक्षे आणि बोमन इराणी हे तिन्ही कलाकार पालकांच्या भूमिकेत दिसतात. तसेच भारती आचरेकर, इषा कोप्पीकर, आकाश ठोसर, संस्कृती बालगुडे, सत्या मांजरेकर हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.

‘एफयू’ येत्या २ जूनला प्रदर्शित होणार आहे. ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’चा टीझर काहीसा निराशा करणारा देखील आहे. कारण या मध्ये आकाशचा आवाजात तो डब करण्यात आल्याचे लगेच कळून येते. टीझरध्ये संवादांपेक्षा म्युझिक अधिक आहे त्यामुळेही काही प्रमाणात निराशा होते.