मुंबई : आज कन्नड सुपरस्टार राजकुमार यांची ८८ वी जयंती आहे. भारतीय सिनेमाचे जेम्स बाँड आणि प्रसिद्ध कन्नड अॅक्टर राजकुमार यांना गुगलने डूडल बनवून सलाम केला आहे.
राजकुमार यांचा जन्म २४ एप्रिल १९२९ मध्ये झाला होता. त्यांचे नाव सिंगानाल्लुरु पुत्तस्वमय्या मुथुराज असे होते. परंतू त्यांच्या चाहत्यांनी त्यांना अनेक नावं दिलीत अभिनयाचे शहंशाह, सोन्याचा माणूस, ब्रदर राज अशा अनेक नावांनी त्यांची ओळख होती. ते चांगले अभिनेता होतेच परंतू त्यासोबत ते चांगले गायकही होते.
१९५४ मध्ये त्यांचा 'बेडरा कन्नपा' हा पहिला चित्रपट आला होता, तर २००० मध्ये त्यांचा 'शब्दवेधी' हा शेवटचा चित्रपट प्रकाशित झाला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी २०० हुन अधिक चित्रपट काढले. तसेच त्यांनी ४०० गाणीही गायली आहेत. त्यांना १९८३ मध्ये पद्मविभूषणने गौरवण्यात आले होते. तसेच त्यांना तीन नॅशनल अवॉर्डही मिळाले होते. त्यामधील एक त्यांच्या गाण्यासाठी होता. तसेच दादासाहेब फालके, फिल्मफेअर अवॉड, कर्नाटक स्टेट फिल्म अवॉड्सनेही त्यांना गौरवण्यात आले होते.
राजकुमारला भारतीय सिनेमाचा महानायक म्हणून ओळखले जातात. कारण अॅक्टींग करताना त्यांनी कधीच मद्य आणि धूम्रपानाचे सेवन नाही केले. तसेच त्यांनी कुठल्याच चित्रपटात 'कसम खाता हू' सारखे डायलॉगही नाही वापरले. राजकुमार यांचे वैयक्तिक जीवनही चित्रपटांसारख रोमांचक होतं. २००० मध्ये तस्कर वीरप्पनने त्यांचे अपहरण केले होते. १०८ दिवस ते घनदाट जंगलात त्याच्या तावडीत होते. १२ जुलै २००६ मध्ये वयाच्या ७७ वर्षी ह्रद्यविकाराने त्यांचे निधन झाले.