आमिरची पत्नी किरणच्या घरी 80 लाखांची चोरी

बॉलीवूड अभिनेता आमिर खानची पत्नी किरण रावच्या वांद्रेस्थित घरातून तब्बल 80 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झालीये. किरणच्या एका नातेवाईकाने याबाबतचा एफआयआर पोलीस ठाण्यात दाखल केलाय. 

Updated: Nov 29, 2016, 12:28 PM IST
आमिरची पत्नी किरणच्या घरी 80 लाखांची चोरी title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खानची पत्नी किरण रावच्या वांद्रेस्थित घरातून तब्बल 80 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झालीये. किरणच्या एका नातेवाईकाने याबाबतचा एफआयआर पोलीस ठाण्यात दाखल केलाय. 

किरण राव आणि आमिर खान कार्टर रोड येथील अपार्टमेंटमध्ये राहतात. तक्रारीनुसार किरणला गेल्याच आठवड्यात आपला हिऱ्यांची अंगठी आणि नेकलेस चोरीला गेल्याचे समजले. 

सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्याच घरातील मोलकरणीने ही चोरी केल्याचा संशय आहे. दरम्यान, याप्रकरणी किरण राव तसेच पोलिसांना कोणतीही माहिती मिळालेली नाही.