आमिरचा फॅट टू फिट प्रवास

बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा दंगल हा सिनेमा येत्या 23 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमात आमिरचे दोन लुक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 

Updated: Nov 29, 2016, 12:02 PM IST
आमिरचा फॅट टू फिट प्रवास title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा दंगल हा सिनेमा येत्या 23 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमात आमिरचे दोन लुक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 

एका लुकमध्ये आमिर वजनदार दिसत आहे तर दुसऱ्या लुकमध्ये तो एकदम फिट दिसतोय. यूटीव्ही मोशनने आमिरचा फॅट टू फिट या प्रवासाचा व्हिडीओ जारी केलाय. हा व्हिडीओ वजन कमी कऱणाऱ्य़ांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

आमिरला या प्रवासासाठी पाच महिने लागले. यात त्याने भरपूर व्यायाम तसेच डाएटिंगही केली.