गरोदर असतांना या ५ अभिनेत्रींनी केला सिनेमा

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी त्या गरोदर असल्याची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला. अनेक अभिनेत्री या दरम्यान कॅमेरापासून लांबच होत्या. पण काही अशाची बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी गरोदर असतांनाही सिनेमामध्ये काम केलं आहे.

Updated: Jul 5, 2016, 05:19 PM IST
गरोदर असतांना या ५ अभिनेत्रींनी केला सिनेमा title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी त्या गरोदर असल्याची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला. अनेक अभिनेत्री या दरम्यान कॅमेरापासून लांबच होत्या. पण काही अशाची बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी गरोदर असतांनाही सिनेमामध्ये काम केलं आहे.

१. करीना कपूर : काही दिवसांपूर्वीच सैफ अली खानने गोड बातमी दिली होती. करीनाही जवळपास ३ महिन्यांपासून प्रेग्नेंट आहे आणि लवकरच ती तिच्या आगामी वीरे दी वेडिंग सिनेमाचं शुट सुरु करणार आहे. या सिनेमामध्ये करीना प्रेग्नेंट महिलेचीच भूमिका करणार आहे.

२. जया बच्चन : शोले सिनेमाची शूटिंग सुरु होती तेव्हा जया बच्चन ह्या ३ महिन्याच्या गर्भवती होत्या. अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, सिनेमाच्या काही दृश्यांमध्ये तुम्ही जया यांना गर्भावस्थेत पाहू शकता.

३. काजोल : मुलगी न्यासाच्या जन्मानंतर काजोलने ब्रेक घेतला होता. यानंतर 'वी आर फॅमिली' सिनेमामध्ये काजोलने पुन्हा काम केलं होतं. ज्या वेळेस सिनेमाची शूटिंग सुरु होती त्यावेळेस ती प्रेग्नेंट होती. शूटिंग संपल्यानंतर काजोल मॅटर्निटी ब्रेकवर गेली होती.

४. जूही चावला : करीना प्रमाणेच जूही आणि रियल आणि रील प्रेग्नेंसीही खरी होती. झंकारच्या शूटिंगदरम्यान जुहीला ७ वा महिना सुरु होता. सिनेमामध्ये  संजय सूरीच्या पत्नीची भूमिका तिने केली होती.

५. नंदिता दास : नंदिता दास जेव्हा ५ महिन्याच्या प्रेग्नेंट होत्या त्या दरम्यानच निर्माते ओनीर यांचा सिनेमा आय एमच्या शूटिंगमध्ये ती काम करत होती. यामध्ये ती एका सिंगल वुमनची भूमिका करत होती जी आई बनण्यासाठी उत्सूक होती.