अखेर देसी गर्ल प्रियांकाला बेवॉचच्या पोस्टरवर जागा मिळाली!

देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्या 'बेवॉच' या चित्रपटाचं एक नवं पोस्टर प्रदर्शित झालंय. या पोस्टरवर प्रियांका एका वेगळ्याच अंदाजात दिसतेय. 

Updated: Jul 5, 2016, 04:26 PM IST
अखेर देसी गर्ल प्रियांकाला बेवॉचच्या पोस्टरवर जागा मिळाली! title=

मुंबई : देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्या 'बेवॉच' या चित्रपटाचं एक नवं पोस्टर प्रदर्शित झालंय. या पोस्टरवर प्रियांका एका वेगळ्याच अंदाजात दिसतेय. 

उल्लेखनीय म्हणजे, याआधी प्रदर्शित करण्यात आलेल्या 'बेवॉच'च्या पोस्टरवर प्रियांकासोडून इतर कलाकार दिसत होते. प्रियांका या पोस्टरवरून गायब असल्यानं तिचे चाहते मात्र निराश झाले होते. 

खुद्द प्रियांकानंच आपलं हे पोस्टर इन्टाग्रामवर शेअर केलंय. यावेळी, 'शेवटी, आम्ही सगळे एका फ्रेममध्ये दिसलो' असं प्रियांकानं म्हटलंय. 

'बेवॉच'च्या या पोस्टरमध्ये प्रियांका वगळता सर्व कलाकारांनी लाल रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत. चित्रपटात वेरोनिका ही खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या प्रियांकाचा हॉट अंदाज पोस्टरवर दिसतो. तर अलेक्झांड्रा दद्दारिओ, इलफेनेश हॅडेरा आणि केली या अभिनेत्री पोस्टरवर बिकनीमध्ये झळकल्या आहेत. याव्यतिरीक्त ड्वेन जॉन्सन (रॉक), झॅक एफरॉन, जॉन बॅस हे कलाकार पोस्टरवर आहेत.

नव्वदीच्या दशकात टेलिव्हिजनवर आलेली ‘बेवॉच’ ही मालिका अमेरिकेसह जगभरात चांगलीच गाजली होती. दिग्दर्शक सेठ गॉर्डन यांनी आता या मालिकेवर चित्रपट तयार केला आहे.