नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण हिचा 'माय चॉईस' हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे.
या व्हिडिओत, 'माझं शरीर, माझे विचार आणि निर्णयही माझाच...' असं काहीसं म्हणणारी दीपिका पुढे म्हणते, एखाद्या महिलेनं कुणाशी लग्न करावं किंवा करू नये... कुणाशी शारिरिक संबंध बनवावेत आणि कुणाच्या मुलाची आई बनावं याचा निर्णय तिनंच घ्यावा... इतरांना हा अधिकार नाही. सोबतच ती असंही म्हणताना दिसते की, तिनं लग्नाआधी शारिरीक संबंध बनवावेत किंवा लग्नानंतर दुसऱ्याशीच शारिरीक संबंध बनवावेत याचा निर्णयही तिनंच घ्यायचाय.
दीपिकाच्या या व्हिडिओला काही जणांनी डोक्यावर घेतलंय तर काही जणांना मात्र यातले तिचे काही विचार पटलेले दिसत नाहीत. दीपिकाचा हा केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे.
अंकुर पोद्दार नावाच्या एक व्यक्तीनं दीपिकाच्या याच व्हिडिओला 'पुरुषां'च्या नजरेतून थोडा बदल करून सादर करण्याचा प्रयत्न केलाय. या व्हिडिओत त्यानं 'पुरुषांची चॉईस' केंद्रस्थानी ठेवल्याचं दिसतं.
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.