रिव्ह्यू: एका खास जीवनाची वाटचाल 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ'

शोनाली बोस दिग्दर्शित, कल्की कोचलीन अभिनित 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ' हा सिनेमाही आज प्रदर्शित झालाय. सेलेब्रल पाल्सी नावाच्या एका आजारानं ग्रस्त असलेल्या लैला या मुलीची ही गोष्ट. 

Updated: Apr 17, 2015, 05:58 PM IST
रिव्ह्यू: एका खास जीवनाची वाटचाल 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ'  title=

मुंबई: शोनाली बोस दिग्दर्शित, कल्की कोचलीन अभिनित 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ' हा सिनेमाही आज प्रदर्शित झालाय. सेलेब्रल पाल्सी नावाच्या एका आजारानं ग्रस्त असलेल्या लैला या मुलीची ही गोष्ट. 

लैला जरी या आजारानं ग्रस्त असली तरी तिच्या वयाप्रमाणं तिच्या शारीरीक गरजा वाढत असतात. एका स्त्रीच्या भावना, तिच्या इच्छा आकांक्षा मग जरी ती पिझिकली किंवा मेंटली चॅलेंज्ड असली तरी त्या गोष्टींना दुलर्क्षित करता येत नाही, अशा काहीशा आशयावर बेतलेला हा सिनेमा आहे.

कथा
'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ' या सिनेमात अभिनेत्री कल्की कोचलीन खऱ्या अर्थानं बाजी मारुन जाते. लैला ही भूमिका तिनं साकारलीय. एक अत्यंत हुशार मुलगी असते, तिच्या विद्यापीठाच्या बॅन्डसाठी ती एक गाणं लिहीते, त्याच विद्यापीठातील एक मुलगा तिला आवडतो. त्यानं तिला नाकारल्यामुळे लैला खूप अपसेट होते पण पुन्हा एकदा नव्यानं आयुष्याची सुरुवात करते. 

न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीकडून तिला एक छान संधी मिळते. इन शॉर्ट लैलाचा हा प्रवास खूप सुंदर पद्धतिनं दिग्दर्शिका शोनाली बोसनं मांडलाय.

अभिनय
या सिनेमातला कल्कीचा अभिनय खरंच लाजवाब झालाय. अभिनेत्री कल्कीसाठी हा तिचा आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स ठरू शकतो. या सिेनेमाला आम्ही देतोय साडेतीन स्टार्स.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.