मुंबई: आज सुवर्ण कमळ विजेता चित्रपट 'कोर्ट' मोठ्या पडद्यावर झळकलाय. आजच्या न्याय प्रक्रियेवर आणि कायदा सुव्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे कोर्ट.. कोर्ट या सिनेमाला सुवर्ण कमळ मिळाल्यानंतर या सिनेमाबद्दची उत्सुकता वाढली होती.
कथा
नारायण कामळे नावच्या एका 65 वर्षीय शाहीराची ही गोष्ट.. कायम वेगवेगळ्या सामाजिक आश्यावर पोवाडे गाणाऱ्या, या शाहीराच्या एका कार्यक्रमादरम्यान एक गटार साफ करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू होतो. याच दरम्यान नारायण कामळे यांना अटक होते. या कर्मचाऱ्याचा मृत्यू नारायण कामळे या शाहीरनं गायलेल्या पोवाड्यामुळंच झालाय, असं पोलिसांचं म्हणणं असतं. एका शाहीरानं गायलेल्या पोवाड्याच्या आशयामुळे एका सफाइ कामगाराचा मृत्यू कसा होऊ शकतो, यासाठी नारयण कामळे यांचे वकिल विनय वोरा प्रयत्नशील असतात.
खरंतर ही कहाणी कुणा एकाची नसून कोर्ट हा सिनेमा खऱ्या खुऱ्या कोर्टाचं वास्तववादी दर्शन लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. याचबरोबर कोर्ट सिनेमातील अनेक पात्रांची गोष्ट सांगतो. गीतांजली कुलकर्णीनं साकारलेली नुतन ही व्यक्तिरेखा त्यचबरोबर अभिनेता विवेक गोंबरनं साकारलेली वकील विनय वोहरा ही व्यक्तिरेखा, यातला जज, या सगळ्या पात्रांची वैयक्तिक गोष्ट आणि हे चौघंही एकत्र असलेल्या या केस भोवती या सिनेमाची कथा रंगवण्यात आली आहे.
दिग्दर्शन
दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी अगदी क्रिएटिव्ह पद्धतीनं सिनेमाच्या कथेची हाताळणी केली आहे. आजच्या न्यायालयीन सुव्यवस्थेबाबतचं त्यानं वास्तवदर्शी चित्र प्रेझेंट केलंय. एक असा सिनेमा ज्याचा शेवटच नाही.
या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे यात दिग्दर्शकानं जास्तीत जास्त नवोदित व्यक्तींचा वापर केलाय. गीतांजली कुलकर्णी आणि विवेक गोंबर हे दोन कलाकार वगळता यात सगळेच नॉन अॅक्टर्स आहेत. या सगळ्या नॉन अॅक्टर्सकडून काम करुन घेणं खरंच दिग्दर्शकासाठी मोठं आव्हान असेलच, पण त्यांनी ते खूप परफेक्टली निभावलंय. या एका वेगळ्या प्रयोगामूळे सिनेमाला खरंच एक रॉ लूक मिळवण्यात मदत झाली आहे. यामूळे सिनेमा खूप वास्तववादी वाटतो.
यातली प्रत्येक भूमिका मग तो शाहिर असो, चाळीतली एक बाई असो, त्या वकिलाचे गुजरातीत बोलणारे पालक असो. हे सगळेचजण रिअल वाटतात. या सिनेमात त्यानं मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती अशा तीनही भाषांचा वापर केलाय, पण भाषा इतक्या सोप्या पद्धतीनं सादर केली आहे की ते संवाद समजून घेणं कठीण वाटते नाही.
सिनेमात मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती अशा चारही भाषांचा वापर करण्यात आलाय. त्यामुळं सगळ्याच प्रेक्षकांना हा सिनेमा कळेल का? या बाबत शंकाच वाटतेय. याच बरोबर एका टिपीकल कमर्शियल सिनेमाच्या तुलनेत हा सिनेमा खूप वेगळा आहे, प्रयोगात्मक आहे. त्यामुळं व्यावसायिकदृष्ट्या या सिनेमाला किती यश मिळेल याबाबत शंकाच वाटते.
या सिनेमाला आम्ही देतोय साडे तीन स्टार्स.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.