झुकरबर्गच्या घरी आली छोटी परी, दान करणार ९९ टक्के हिस्सेदारी

सोशल मीडिया वेबसाइट फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या घरी छोट्या परीचे आगमन झाले आहे. तिचे नाव मॅक्स ठेवण्यात आले आहे. 

Updated: Dec 2, 2015, 09:01 AM IST
झुकरबर्गच्या घरी आली छोटी परी, दान करणार ९९ टक्के हिस्सेदारी title=

सॅनफ्रान्सिस्को : सोशल मीडिया वेबसाइट फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या घरी छोट्या परीचे आगमन झाले आहे. तिचे नाव मॅक्स ठेवण्यात आले आहे. 

झुकरबर्गला मुलीच्या जन्माचा इतका आनंद झाला आहे, त्याने आपल्या संपत्तीतील ९९ टक्के हिस्सा आपल्या आयुष्यातच दान करणार आहे. आपल्या मुलीसाठी चांगले जग निर्माण करण्याचा त्याचा उद्देश आहे. आपल्या फेसबूक पेजवर झुकरबर्गने म्हटले आहे की तो आणि पत्नी प्रिसिला आपल्या आयुष्यातच कंपनीतील आपली ९९ टक्के भागिदारी दान करणार आहे. 

सध्याचा हिशेब केला तर ही रक्कम ४५ अब्ज डॉलर आहे. असे करून तो जगातील सर्व मुलांसाठी चांगले जीवनमान निर्माण करण्यात छोटीशी मदत करणार आहे. मुलीच्या जन्मानंतर लिहिलेल्या आपल्या पत्रात झुकरबर्गने अशी सुरूवात केली की, तुझी आई आणि माझ्याकडे त्या आशेबद्दल बोलण्यास शब्द नाही आहे जी तू भविष्यासाठी आम्हांला दिली आहे. 

आपल्या मुलीला म्हटले आहे की, तुझ्या पिढीला संधी तेव्हाच निर्माण होईल, जेव्हा सर्वांना इंटरनेट एक्सेस मिळेल. झुकरबर्ग म्हटला की तो लवकरच दानासंबंधी तपशीज जारी करणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.