११ वर्षीय मुलीने केली आईची डीलिव्हरी, नंतर गेली शाळेत

इंग्लंडमध्ये एक सुखद धक्का देणारी घटना घडली. एका ११ वर्षीय केटलीन बर्क या शाळकरी मुलीने चक्क आईची डीलिव्हरी केली. त्यानंतर ती शाळेत गेली.

Reuters | Updated: Dec 1, 2015, 10:21 PM IST
११ वर्षीय मुलीने केली आईची डीलिव्हरी, नंतर गेली शाळेत title=

लंडन : इंग्लंडमध्ये एक सुखद धक्का देणारी घटना घडली. एका ११ वर्षीय केटलीन बर्क या शाळकरी मुलीने चक्क आईची डीलिव्हरी केली. त्यानंतर ती शाळेत गेली.

गार्डीयनने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी बर्मिंगहॅममधील येथे स्टॅफर्डशायर येथे ही सुखद घटना घडली. केटलीनच्या आईने गोंडल बाळाला जन्म दिला. केटलीन हिने आईची डीलिव्हरी करण्यास मोठी जबाबदारी पेलली. आईला कळा येऊ लागताच केटलीने तात्काळ फोन करुन एम्बुलेंस बोलवली. त्यामुळे तिच्या आईची डीलिव्हरी सुरळीत झाली. केटलीनच्या आईने मुलीला जन्म दिला.

मला बहीण झाल्याने मी खूप खूश आहे. मला वाटते एक वास्तव होते. हे वास्तव खूप सुंदर आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करत राहीन, असे केटलीन हिने आपला आनंद व्यक्त केला.

तर केटलीनची आई ताराने सांगितले, माझ्या मुलीचा मला खूप अभिमान आहे. मला होणाऱ्या वेदनेमुळे ती सतर्क झाली. केटलीन जे केले ते कौतुक करण्या जोग आहे. मी ते शब्दात मांडू शकत नाही. मी तिला कॉल करण्याचे सांगितले, तिने आपले काम केले, असे तिच्या आईने आनंद व्यक्त करताना सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.