फिलीपाईन्स : मनिला या फिलीपाईन्समधील एका शहरात सुमारे १३ हजार लोकांनी एकत्र झुंबा डान्स सादर करून एक नवीन रेकॉर्ड रचला आहे. या आधी आठ हजार लोकांनी एकत्र नृत्य करून विक्रम केलेला होता. हा विक्रम फिलीपाईन्समधील लोकांनी मोडीत काढला आहे.
झुंबा या डान्स प्रकाराचा उगम अतिशय गंमतीशीर आहे. अलबटरे पेरेझ या कोलंबीयातील नृत्य कलाकारांनी एरोबिक्स या व्यायाम प्रकाराची सीडी विसरल्यामुळे लॅटीन संगीताची सीडी लावली आणि त्यावर नृत्यप्रकार केले. हाच नृत्यप्रकार पुढे जाऊन झुंबा डान्स म्हणून ओळखला जाऊ लागला.
एरोबिक्सप्रमाणे झुंबा डान्सदेखील व्यायामाचाचं एक प्रकार आहे. भारतात या नृत्यप्रकाराला खूप लोकप्रियता मिळाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.