मुंबई हल्ल्यातील सूत्रधार लक्वीला सोडले

मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड तसेच लश्कर-ए-तोएबाचा दहशतवादी  झकी-उर-रहमान लख्वी याला सोडून देण्यात आले आहे. लख्वी याला रावळपिंडी येथील तरुंगातून मुक्त करण्यात आले. लाहोर न्यायालयाने त्याला सोडून देण्याचे आदेश दिलेत.

Reuters | Updated: Apr 10, 2015, 04:34 PM IST
 मुंबई हल्ल्यातील सूत्रधार लक्वीला सोडले title=

लाहोर : मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड तसेच लश्कर-ए-तोएबाचा दहशतवादी  झकी-उर-रहमान लख्वी याला सोडून देण्यात आले आहे. लख्वी याला रावळपिंडी येथील तरुंगातून मुक्त करण्यात आले. लाहोर न्यायालयाने त्याला सोडून देण्याचे आदेश दिलेत.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याला सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा पंजाब सरकारच्या आदेशाला स्थगिती दिली होती. लाहोर उच्च न्यायालयाने त्याची सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज त्याची सुटका करण्यात आली.

या सुटकेबाबत भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकार लख्वीविरोधात संवेदनशील अभिलेख सादर करण्यास अपयशी ठरल्याने त्याच्या स्थानबद्धतेला स्थगिती देण्यात आली आहे. सुटकेसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा जामीन सादर करण्याची अट न्यायालयाने घातली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.