१४ सिंहाचा हल्ला, १ हत्ती परतून लावतो तेव्हा

एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. एका नदीजवळ चौदा सिंह हत्तीवर हल्लाबोल करतात.

Updated: Nov 13, 2014, 10:45 AM IST
१४ सिंहाचा हल्ला, १ हत्ती परतून लावतो तेव्हा title=

जांबिया  :  (दक्षिण आफ्रिका) एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. एका नदीजवळ चौदा सिंह हत्तीवर हल्लाबोल करतात, हत्ती केविलवाण्या परिस्थितीत नदीच्या पाण्यातून रस्ता काढतो, पाण्याचा प्रवाह कापत हत्ती नदी पार करतो, मात्र शेवटी हत्तीचा संयमाचा बांध कोसळतो.. आणि मग १४ सिंहांची कशी शेळी होते आणि हत्तीचं बळ घेऊन हत्तीच कसा सिंहासारखा चाल करतो आणि मग काय होतं... बातमी खालील व्हिडीओत पाहा

कुठे आणि कुणी चित्रित केला आहे व्हिडीओ

न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या बातमीनुसार दक्षिण आफ्रिकेच्या जांबियाच्या नॉरमन कार सफारीज चिनजॉंबो कॅम्पमध्ये सिंह आणि बेबी हत्तीची अशी चकमक पाहण्यास मिळणे फार कठीण आहे.

नदी किनारी १४ सिंह होते, बेबी हत्तीला वाचवण्यासाठी तिथे कुणीच नव्हतं, यातील दोन सिंह हत्तीच्या पाठीवर चढून बसले आणि सोडायला तयार नव्हते.

व्हिडीओबातमीच्या खाली पाहा

सुरूवातीला हत्तीला शरण जावं लागलं, सिंहांची पकड एवढी घट्ट होती की, वाटत होतं आता हत्ती संपलाच.

मात्र हत्तीनेही दाखवून दिलं की तोही किती शक्तीशाली आहे, तो जरी वयाने थोडा लहान असला, तरी त्याच्याजवळ जीव वाचवण्याचे अनेक उपाय आहेत.

हा व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेतील जांबियाच्या नॉरमन कार सफारीजमधील चिनजॉंबो कॅम्पमध्ये, पत्रकार जेश नेश यांनी शूट केला आहे, त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मित्र देखिल होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.