ऐतिहासिक... 'धूमकेतू'वर उतरलं अंतराळ यान!

जवळपास दहा वर्षांपूर्वी अंतराळात सोडण्यात आलेलं अंतराळ यान ‘रोसेटा’ याचं रोबोट यान ‘फिले’ पृथ्वीपासून जवळपास ५० करोड किलोमीटर दूर असणाऱ्या ‘६७-पी चुरयोमोव-गेरासिमेन्को’ या धूमकेतूवर उतरलंय.

Updated: Nov 13, 2014, 08:31 AM IST
ऐतिहासिक... 'धूमकेतू'वर उतरलं अंतराळ यान! title=

नवी दिल्ली : जवळपास दहा वर्षांपूर्वी अंतराळात सोडण्यात आलेलं अंतराळ यान ‘रोसेटा’ याचं रोबोट यान ‘फिले’ पृथ्वीपासून जवळपास ५० करोड किलोमीटर दूर असणाऱ्या ‘६७-पी चुरयोमोव-गेरासिमेन्को’ या धूमकेतूवर उतरलंय.

या धूमकेतूवर स्पेसक्राप्टच्या सहाय्यानं प्रोबचं यशस्वी लॅण्डिंग झालंय. या उपक्रमातून युरोपीयन स्पेस एजन्सीने इतिहास घडवलाय. २२० पाऊन्ड म्हणजे सुमारे १०० किलो वजनाचा बॉक्सचा आकाराचा हा प्रोब आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८.३० वाजता या तीन पायांच्या फिलेचं लॅन्डींग झालं. अंतराळाच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे. 

हा धूमकेतू पृथ्वीपासून इतका दूर आहे की, धूमकेतूवर हा प्रोब उतरल्याची सूचना २८ मिनिटांनंतर मिळाली. 'रोसेटा' या अंतराळयानाच्या सहाय्यानं शास्त्रज्ञांनी हा प्रकल्प यशस्वी केला. फिले माहिती आणि छायाचित्र पृथ्वीवर पाठवणार आहे. 

रोसेटा अंतराळ यान २ मार्च २००४ रोजी सोडण्यात आलं होतं. आपल्या या उड्डाणादरम्यान वीज वाचवण्यासाठी जवळपास अडीच वर्षांपर्यंत ‘रोसेटा’ कृत्रिम रुपात कोमामध्ये गेलं होतं. त्यानंतर २०१४ मध्ये हे यान धूमकेतूच्या जवळ पोहचलं होतं आणि त्याच्या उपग्रहाप्रमाणे त्याच्याभोवती घिरट्या घालू लागलं होतं. 

फिलेचं वजन जवळपास १०० किलो आहे. यावर लावण्यात आलेल्या शेवकडो वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्यानं धूमकेतूचा अभ्यास केला जाणार आहे. या संपूर्ण योजनेवर यूरोपीय अंतराळ एजन्सीनं जवळपास एक अरब ३० करोड यूरो खर्च केलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.