Year Ender 2015 : 'दहशतवाद'... जागतिक स्तरावरचा!

 २०१५ या वर्षात जागतिक स्तरावर  मोठ्या प्रमाणात इस्लामिक दहशतवाद पसरलेला दिसून आला. बोको हरम, इसिस यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या क्रूर आणि भ्याड हल्ल्यांना अनेक जण बळी पडलेत. 

Updated: Dec 18, 2015, 02:01 PM IST
Year Ender  2015 : 'दहशतवाद'... जागतिक स्तरावरचा! title=

मुंबई : २०१५ या वर्षात जागतिक स्तरावर  मोठ्या प्रमाणात इस्लामिक दहशतवाद पसरलेला दिसून आला. बोको हरम, इसिस यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या क्रूर आणि भ्याड हल्ल्यांना अनेक जण बळी पडलेत. 

जानेवारी महिन्यात बोको हरमच्या हल्ल्यात जवळपास २००० जणांचा जीव गेला तर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पॅरीसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात अनेक जण ठार झाले. संपूर्ण वर्षभर कुठला ना कुठला दहशतवादी हल्ला चर्चेत राहिला... आणि दहशतवादाची भीषण वास्तवता या प्रत्येक घटनेमधून प्रकर्षानं दिसून आली. 

नायजेरियामधलं बागा हत्याकांड

३ जानेवारी ते ७ जानेवारी २०१५ दरम्यान नायजेरियात झालेल्या हल्ल्यात जवळपास दोन हजार जण ठार झाल्याचं वृत्तांकन पश्चिमेकडील मीडियानं केलंय. नायजेरियातील अनेक नागरी वस्त्यांवर आणि आर्मी बेस कॅम्पवर हल्ला करत इथं बोको हरमच्या दहशतवाद्यांनी ताबा मिळवलाय. 

अधिक वाचा - नायजेरियातला दहशतवाद

 

शार्ली हेब्दो हत्याकांड

फ्रान्सचं प्रसिद्ध मॅगझिन शार्ली हेब्दोवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ११ जण मारले गेले तर अनेक जण जखमी झाले. दोन इस्लामिक भावांनी ७ जानेवारी रोजी हा हल्ला घडवून आणला होता. शस्त्रधारी हल्लेखोरांनी मॅगझिनच्या ऑफिसमध्ये बेधुंद गोळीबार केला. या दहशतवाद्यांचा अल कायदाशी संबंध उघड झाला. 

अधिक वाचा - पॅरिस : साप्ताहिकाच्या ऑफिसवर दहशतवादी हल्ला 

 

रशियाचं विमान इजिप्तमध्ये पाडलं

२१७ प्रवाशांना घेऊन जाणारं रशियन एअरलाईन्सचं एक विमान दहशतवादी हल्ल्याला बळी पडलं. इजिप्तमधल्या 'सिनाई' इथं एअरबस ए-३२१ या विमानाचा अपघात घडवून आणण्यात आला. या अपघातातून कुणीही बचावलं नाही. या विमानाच्या डेब्रिजमध्ये स्फोटकं आढळल्याचं रशियन सिक्युरिटी सर्व्हिसेसनं जाहीर केलं. 
इराकमधल्या इस्लामिक स्टेट अॅन्ड लेव्हन्ट (ISIL)या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर रशियानं सिरियातील इसिसविरुद्ध युद्ध पुकारलंय आणि या भागात हल्ले चढवलेत.

व्हिडीओ | इसीसीकडून रशियाचं विमान पाडल्याचा दावा

अधिक वाचा - रशियाचं विमान कसं उडवलं 'आयसिस'नं केलं प्रसिद्ध

अधिक वाचा - आयसिसच्या खात्म्यासाठी रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग एकटवलं!

 

पॅरीसवर पुन्हा दहशतवादी हल्ला
१३ नोव्हेंबर रोजी झालेल्या या आत्मघातकी हल्ल्यांत हल्ल्यात जवळपास १३० जण ठार झाले. 
जी-२०ची परिषदेच्या अगोदर अतिरेक्यांनी एकाच वेळी ७ ठिकाणी हे हल्ले केले. फूटबॉल स्टेडिअमजवळ एक हल्ला करण्यात आला. यावेळी जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात फूटबॉलचा सामना सुरु होता.

अधिक वाचा - फ्रान्समध्ये मोठा अतिरेकी हल्ला

अधिक वाचा - पॅरिस अतिरेकी हल्ला : सोशल मीडियावर 'इसिस'चा जल्लोष

अधिक वाचा - पॅरीस हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्देल हमिद याला कंठस्नान

VIDEO : पॅरीस हल्ला; दु:खानं स्टेजवरच कोसळली मॅडोना!