बीजिंग : जगातील सर्वात वाईट बॉस या व्हिडीओत लपलेला आहे. सध्या जगात सतत वाढत झालेली स्पर्धा यामुळे तुम्ही कंपनीला काय योगदान देताय ते अधिक महत्वाचं ठरतं, तुम्ही व्यवसाय वाढवण्यास मदत केली तर तुमची वाह वा होते, कामावर कुणी असमाधानी असेल, तर सुधारणा करण्याबाबत सूचना होतात.
मात्र चीनमधील शांघझी प्रांतातील एका ग्रामीण व्यावसायिक बॅंकेमध्ये, बॉस असामाधानी असल्याने त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना गजाने बडवून काढलं आहे, यात दोन महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.
बॅंक मॅनेजरने ८ कर्मचाऱ्यांना एका कार्यक्रमात त्यांच्या पार्श्वभागावर रॉडने फटके दिले. ‘पीपल्स डेली’ने हा व्हिडीओ फेसबुक पेजवर प्रकाशित केला आहे.