जगातील सर्वात मोठ्या लांबीचा रेल्वे बोगदा खुला

जगातील सर्वात लांबीचा तसेच खोली असलेला रेल्वे बोगदा तयार झाला आहे. स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगातून हा बोगदा जातो. ५७.१ किमी लांबीचा हा बोगदा आहे. 

Updated: Jun 2, 2016, 12:55 PM IST
जगातील सर्वात मोठ्या लांबीचा रेल्वे बोगदा खुला title=

झ्युरिच : जगातील सर्वात लांबीचा तसेच खोली असलेला रेल्वे बोगदा तयार झाला आहे. स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगातून हा बोगदा जातो. ५७.१ किमी लांबीचा हा बोगदा आहे. 

या बोगद्यासाठी तब्बल  १०.३ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आला आहे. यासाठी तब्बल दोन हजार कामगार २० वर्षे काम करत होते. 

या बोगद्यामुळे  झुरीच व मिलान यादरम्यानचा प्रवास जलद होणार आहे. बोगद्यामुळे यातील अंतर एक तासांनी कमी होणार आहे्. 

या बोगद्यात दोन सिंगल ट्रक करण्यात आले आहेत. या ट्रॅकवरून ताशी २५० किमी वेगाने रेल्वे प्रवास करू शकतील. दररोज २६० मालगाड्या व ६५ प्रवासी रेल्वे या बोगद्यातून प्रवास करु शकतात.