लंडन: कधी आपल्यासोबत असं घडलं का? की आपल्या मैत्रीपूर्ण व्यवहारानंतर समोरच्यानं तुमच्याकडे सेक्सची इच्छा व्यक्त केली असेल, किंवा या उलट... जगात अनेक काळापासून असलेल्या या समस्येशी निगडीत गूढ निवारलं गेलंय.
एका अभ्यासात हे समोर आलंय की, अनेक महिलांच्या मते त्यांचे पुरूष सोबती त्यांच्या मैत्रीच्या व्यवहाराला सेक्स संकेत समजतात, तर पुरुषांचं म्हणणं आहे की, त्यांच्या सेक्स संकेतांना महिला मैत्री समजतात.
नॉर्वे विज्ञान आणि प्रौद्योगिकी विश्वविद्यालय (एनचीएनयू)चे संशोधक मोन्स बेंडिक्जेन यांनी सांगितलं, 'जर विकासाच्या नजरेनं पाहिलं तर संशोधनाचे परिणाम धक्कादायक नाहीत.'
संशोधकांनी ३०८ जणांवर हा अभ्यास केलं. ज्यांचं वय १८ ते ३० वर्ष दरम्यान होतं. स्पर्धकांमध्ये ५९ टक्के महिला होत्या. संशोधनानुसार पुरुष आणि महिलांमध्ये त्याच्या म्हणण्याचा उलटा अर्थ त्यांचे विरुद्ध लिंगाचे सोबती घेत असल्याचं पुढे आलं.
नियतकालिक 'इव्होल्युशनरी सायकोलॉजी'मध्ये प्रकाशित झालेल्या शोधानुसार, महिला स्पर्धकांनी सांगितलं की त्यांनी आपल्या जेव्हा आपल्या पुरुष सोबतीसोबत मैत्रीपूर्ण व्यवहार दाखवला. तर मागील एका वर्षात जवळपास ३.५ वेळा त्याचा सेक्ससाठी इच्छा असा अर्थ काढला गेला. पुरुषांनीही महिलांकडून अशा प्रकारची समस्या सांगितली, मात्र पुरुषांच्याबाबती ही आकडेवारी काहीसी कमी आहे.
शोधकर्त्यांनुसार, उत्क्रांतीच्या मानसशास्त्रानुसार गेल्यास याला जास्त चांगल्याप्रकारे समजू शकतो की, पुरुष नेहमी बोलतांना महिलांचं हास्य आणि लाजण्याला त्यांची सेक्सची इच्छा समजतात.
बेंडिक्जेन याला अधिक स्पष्ट करून सांगतात, 'एका पुरूषाची संतानोत्पत्तीची क्षमता तो किती महिलांना गर्भवती करू शकतो, याच्या क्षमतेवर ठेवतो. मात्र महिलांच्या बाबतीत असं नसतं. एक महिला थोड्या अवधीमध्ये अनेक पुरूषांसोबत मुलाला जन्म न देता सेक्स संबंध करू शकते.'
यानुसार पुरुषांसाठी सेक्सचं प्रकरण कमी जोखमीचं असतं आणि कोणत्याही महिलेसोबत सेक्स हा पुरुषासाठी एक संधी असते. तर दुसरीकडे महिलांसाठी अशाप्रकारचा संबंध धोकादायक असतो. कारण त्यांच्यासमोर गर्भवती होणं, बाळाचा जन्म, त्यांचं पालन-पोषण अशाप्रकारचे प्रश्न असतात. सोबतच दुसऱ्या पुरुषासोबत बाळाला जन्म देण्याची संधीही कमी होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.