'अल्लाची इच्छा' म्हणून तिने चिमूरडीचं मुंडकं छाटलं

मॉस्को : काहीच दिवसांपूर्वी एका मुलीचं मुंडकं रशियाच्या मॉस्कोतील मेट्रो स्टेशनमध्ये घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Updated: Mar 3, 2016, 07:23 PM IST
'अल्लाची इच्छा' म्हणून तिने चिमूरडीचं मुंडकं छाटलं title=

मॉस्को : काहीच दिवसांपूर्वी एका मुलीचं मुंडकं रशियाच्या मॉस्कोतील मेट्रो स्टेशनमध्ये घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या महिलेला झालेल्या अटकेनंतर आता मात्र तिने हे कृत्य 'अल्लाच्या इच्छेने' केल्याचं म्हटलं आहे. 

३८ वर्षे वय असणारी गुलशेखरा बोबोकुलोवा हीने आपल्या मुलीचं डोकं कलम केलं होतं. ते मुंडकं ती हातात घेऊन मॉस्कोच्या रस्त्यांवर फिरत होती. सोमवारी तिला पोलिसांनी अटक केली. तिला तीन मुलं आहेत. उझबेकिस्तानची नागरिक असणाऱ्या गुलशेखराला जेव्हा विचारलं गेलं की तिने हे का केलं तेव्हा 'अल्लाची इच्छा' असल्याने आपण असं केल्याचा जवाब तिने कोर्टात नोंदवला.  

मेट्रो स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला एका मुलाचं मुंडकं हातात घेऊन असल्याचं स्पष्ट दिसत होतं. रशियन माध्यमांच्या मते मेट्रो स्थानकात या महिलेने तिच्याकडील एका पिशवीतून हे मुंडकं बाहेर काढलं आणि ती ते घेऊन फिरत होती. काही जणांच्या मते कोणीतरी तिला हे काम करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. 

गुलशेखरा एका घरात आया म्हणून काम करत होती. त्या घराचा मालक जेव्हा नोकरीसाठी घराबाहेर गेला तेव्हा तिने एका मुलीची हत्या केली आणि त्या घराला आग लावून दिली. रशियन पोलीस अधिकाऱ्यांच्या मते गुलशेखरा कोणत्यातरी मानसिक आजारांची बळी आहे.