नोकरी न सोडण्यासाठी गूगलनं 'त्याला' मोजले ३०५ कोटी!

'गूगल'मध्ये २००४ साली रुजू झालेल्या एका व्यक्तीला २०११ मध्ये व्हॉट्सअॅपने नोकरीची ऑफर दिली होती. म्हणून त्याने गूगलमधील नोकरीचा राजीनामा दिला. मात्र त्याने नोकरी सोडू नये, यासाठी गूगलने त्याला चक्क ५० मिलियन डॉलर (३०५ कोटी रुपये) देऊ केलेत. 

Updated: May 13, 2015, 01:08 PM IST
नोकरी न सोडण्यासाठी गूगलनं 'त्याला' मोजले ३०५ कोटी!  title=

मुंबई : 'गूगल'मध्ये २००४ साली रुजू झालेल्या एका व्यक्तीला २०११ मध्ये व्हॉट्सअॅपने नोकरीची ऑफर दिली होती. म्हणून त्याने गूगलमधील नोकरीचा राजीनामा दिला. मात्र त्याने नोकरी सोडू नये, यासाठी गूगलने त्याला चक्क ५० मिलियन डॉलर (३०५ कोटी रुपये) देऊ केलेत. 

सुंदर पिचाई हे गूगलमधलं सध्याचं मोठं नाव आहे आणि अॅन्ड्रॉईड प्रोजेक्ट त्यांचीच देणगी आहे. गूगलचे व्हॉईस प्रेसिडंट असणारे सुंदर पिचाई यांना ऑक्टोबरमध्ये प्रोडक्ट चीफ बनवण्यात आलं होतं. 

चेन्नईच्या एका सर्वसाधारण घरात जन्मलेले सुंदर पिचाई यांच्या घरात टीव्ही, टेलिफोन, गाडी यापैंकी काहीही नव्हतं. आपल्या अभ्यासातील मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांना आईआईटी खडगपूरमध्ये प्रवेश मिळाला. येथून इंजिनीयरिंग केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीची स्कॉकरशीप मिळाली आणि अमेरिका त्यांचं दुसरं घर बनलं. विमान प्रवासासाठी सुंदर यांच्या वडिलांना कर्ज घ्यावं लागलं, यावरून त्यांच्या तेव्हाच्या अर्थिक स्थितीचा अंदाज लावता येईल. 

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 'व्हॉटसअप'नं २०११ मध्ये सुंदर यांना नोकरी ऑफर केली होती. मात्र, गूगलनं त्यांना पिचाई यांना आपल्याकडेच ठेवण्यासाठी तब्बल ३०५ कोटी रुपये देऊन थांबवून घेतलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.