दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार, ४७ जण ठार

पाकिस्तान पुन्हा एकदा दहशतावादी हल्ल्यानं हादरलाय. कराचीमध्ये बसवर बंदुकधारी दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात ४७ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

Updated: May 13, 2015, 04:02 PM IST
दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार, ४७ जण ठार title=

कराची : पाकिस्तान पुन्हा एकदा दहशतावादी हल्ल्यानं हादरलाय. कराचीमध्ये बसवर बंदुकधारी दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात ४७ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

दुचाकीवर आलेल्या ७-८ दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४७ जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये १६ महिलांचा समावेश आहे. बसमध्ये ५०-६० प्रवासी असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. जखमींना जवळच्याच हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. ही बस इस्माईली शिया पंथाच्या प्रवाशांनी भरलेली होती. 

कराचीच्या सफोरा चौकात ही घटना घडलीय. ही घटना पाहणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोटरसायकलींवरुन आलेल्या सहा अतिरेक्यांनी आधी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर बसमध्ये शिरून जे वाचले होते त्यांच्या डोक्यात जवळून गोळ्या घालण्यात आल्या.   

दरम्यान, या घटनेची जबाबदारी तहरिक-ए-तालिबाननं या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्विकारलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.