'एचवनबी' विजाविषयी तीन एप्रिलनंतर बोलू - ट्रम्प

स्थलांतराच्या मोठ्या प्रश्नावर अमेरिकन प्रशासन सध्या काम करत असून एचवनबी विजाविषयी तीन एप्रिलनंतर बोलू, असं व्हाईट हाऊसने नुकतंच जाहीर केलं. 

Updated: Mar 15, 2017, 06:17 PM IST
'एचवनबी' विजाविषयी तीन एप्रिलनंतर बोलू - ट्रम्प title=

वॉशिंग्टन : स्थलांतराच्या मोठ्या प्रश्नावर अमेरिकन प्रशासन सध्या काम करत असून एचवनबी विजाविषयी तीन एप्रिलनंतर बोलू, असं व्हाईट हाऊसने नुकतंच जाहीर केलं. 

हा विजा भारतीय आयटी व्यावसायिकांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. सरकारी आदेशांमधून जाहीर केल्या जाणाऱ्या निर्णयांसंबंधी नागरिकांच्या शंकांचं निवारण सध्या व्हाईट हाऊस करतंय.

त्यांचं आर्थिक वर्ष १ ऑक्टोबरपासून सुरु होतंय. तत्पुर्वी अवैध स्थलांतरच्या प्रश्नावर काम चालू असल्याचं व्हाईट हाऊसचे प्रवक्ता सीन स्पाईसर म्हणाले.