नवी दिल्ली : अवकाशात वीज प्रथम चमकते आणि त्याचा आवाज नंतर ऐकू येतो. म्हणजे प्रकाशाची गती ही ध्वनीपेक्षा अधिक आहे.
आकाशात कडाडणारी वीज पाहून आपल्याला याचा अंदाज येऊ शकतो. अंतराळ यात्री टीम पीक याने अंतराळातून पृथ्वीवर वीज कडाडण्याचा आणि चमकण्याचा एक अद्भूत व्हिडिओ शूट केला आणि ट्विटरवर टाकला आहे.
टीम पीक ब्रिटनचा अंतराळ प्रवासी असून गेल्या अनेक दिवसांपासून तो अंतराळातील स्टेशनवर आहे. तो नेहमी अंतराळातून अद्भूत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. सध्या त्याने ३४ सेकंदाचा अद्भूत व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओ अंतराळातून पृथ्वीवर कशी वीज कडाडते याचे चित्रण करण्यात आले आहे.
Amazing how much lightning can strike our planet in a short time #Principia #timelapsehttps://t.co/XijV5E1pI0
— Tim Peake (@astro_timpeake) February 9, 2016