अबूधाबी: जर पैशांचा पाऊस पडला तर? आपण नेहमी कल्पनेत याचा विचार करतो. पण हे खरंच घडलं तर... हे खरोखरच घडलंय... दुबईतील रस्त्यावर अचानक पैशांचा पाऊस पडू लागला. तेव्हा लोकांनी पैसे गोळा करण्यासाठी त्यांचा पाठलाग सुरू केला.
दुबईच्या जुमायराह परिसरात संध्याकाळी काही मिनिटं पैशांचा पाऊस पडत होता. जेव्हा लोकांनी हे पाहिलं तेव्हा दिरहम (दुबईचं चलन) हवेत उडत होते. ते मिळविण्यासाठी लोकं गाड्यांमधून उतरून ते गोळा करू लागले. तर अनेक जण रस्त्यानं चालतांना ते पकडण्यासाठी धावू लागले.
एका कारमध्ये बसलेल्या तरूणीनं हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय.
पाहा हा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.