VIDEO : पत्नीचे विवाहबाहय संबंध उघड करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत

18 वर्षांचा सुखी संसार. मात्र, या संसाराला नजर लागली. पत्नीची वर्तणूक चांगली नसल्याचे पतीच्या लक्षात आले. मात्र, तिच्यावर लक्ष कसे ठेवायचे हा प्रश्न पतीसमोर होता. पतीने यासाठी उपाय शोधताना ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली.

Reuters | Updated: Nov 18, 2016, 04:56 PM IST
VIDEO : पत्नीचे विवाहबाहय संबंध उघड करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत title=

वॉशिंग्टन : 18 वर्षांचा सुखी संसार. मात्र, या संसाराला नजर लागली. पत्नीची वर्तणूक चांगली नसल्याचे पतीच्या लक्षात आले. मात्र, तिच्यावर लक्ष कसे ठेवायचे हा प्रश्न पतीसमोर होता. पतीने यासाठी उपाय शोधताना ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली.

अमेरिकेतील जॉन जी याने पत्नीचे विवाहबाहय संबंध पकडण्यासाठी ड्रोनची मदत घेतली. उत्तर पेनसिलवेनियामध्ये रहाणाऱ्या जॉनने ड्रोन कॅमेऱ्याने चित्रिकरण करुन पत्नीचे विवाहबाहय संबंध असल्याचा दावा केला आहे. याचे चित्रिकरण यू-ट्यूब या सोशल मीडियावर अपलोडे केलेय. 
 
जॉनला पत्नीचे विवाहबाहय संबंध असल्याचा संशय आला. त्यानंतर त्याने पत्नीच्या ऑफीसच्या मार्गाचे ड्रोन कॅमेऱ्याने चित्रिकरण केले. जॉनची पत्नी डोना घरातून निघाल्यानंतर ऑफीसच्या मार्गाने जात असताना पार्कींगच्या दिशेने गेली. डोना जिथे थांबली होती तिथे काळया रंगाची गाडी आली. डोना गाडीच्या दिशेने गेली दोघांमध्ये काही संवाद झाला. पण जॉनच्या म्हणण्यानुसार पत्नीने गाडीमध्ये बसलेल्या माणसाचे चुंबन घेतले. त्यानंतर डोना दुसऱ्याबाजूने पुढच्या सीटवर जाऊन बसली. 

आपण हे शुटिंग पाहिल्यानंतर व्यथित झालो. मला पत्नीच्या प्रियकराला मारण्याची इच्छा झाली, असे निराश झालेल्या जॉनने म्हटले. जॉनने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. जॉन आणि डोनाला दोन मुले आहेत.