नवी दिल्ली : दक्षिण चीनमध्ये एका सर्प पालन केंद्रात एका अजब कोब्रा पिल्लानं जन्म घेतलाय. या पिल्लू कोब्राचे दोन डोके आहेत... जे एकमेकांना जोडलेले आहेत.
या कोब्राचा जन्म १० दिवसांपूर्वी युलिनमधल्या एका 'स्नेक फार्म'मध्ये झाला होता. हा कोब्रा २० सेंटीमीटर लांब आहे. सर्प पालन केंद्राच्या मालकानं या दोन फणांच्या कोब्रा नागाला नान्निंग प्राणीसंग्रहालयाकडे सोपवलंय.
सुरुवातीला हा नाग काहीही खात नव्हता. त्यामुळे तो खूपच कमी दिवस जगू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, डार्क ब्राऊन रंगाचा या कोब्रानं आता खाणं सुरु केलंय त्यामुळे तो आता पूर्णत: सुरक्षित आहे आणि हळूहळू तो वाढतोय.
या नागाचे दोन फणा वेगवेगळ्या दिशांना आहेत.... आणि दोन्ही तोंड एकमेकांशी भांडण करतात इतकंच नाही तर एकमेकांना गिळण्याचाही प्रयत्न करतात. दोघांचंही डोकं वेगवेगळं असल्यानं ते वेगवेगळ्या दिशांना जाण्याचाही प्रयत्न करतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, असे जीव खूप कमी काळापर्यंत जिवंत राहू शकतात. आत्तापर्यंत दोन फणांच्या एका नागाचा २० वर्षांपर्यंत जगण्याचा रेकॉर्ड आहे.
जीनमध्ये विषारी सापांना पाळलं जातं. शिवाय अनेक औषधं बनविताना या सापांचा वापर केला जातो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.